"चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी "

“चला महाराष्ट्र घडवूया एक घास फाउंडेशन” या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3000 विनामूल्य व्याख्याने दिली आहेत. “चला महाराष्ट्र घडवूया एक घास फाउंडेशन” या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील गरीब,होतकरू व बुद्धिमान 1 लाख विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन. आतापर्यंत क्लास 1,क्लास 2 आणि क्लास 3 आणि इतर परीक्षांमधून 450 विद्यार्थ्यांची निवड. “चला महाराष्ट्र घडवूया,एक घास समाजासाठी” या सामाजिक क्रांतिकारी उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत पुणे,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,ठाणे व विरार इ. कॉलेजमध्ये विनामूल्य मार्गदर्शन. 7 वी पासूनच IAS /IPS ची तयारी या ऐतिहासिक शैक्षणिक ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत. संपूर्ण पिंपरी-चिंचवड सोसायटीमध्ये राबविण्यात येणार आहे.पण त्याची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी मोशी प्राधिकरण येथून करण्याचे नियोजित आहे. स्वयंपूर्ण सोसायटी अंतर्गत बालसंस्कार व युवासंस्कार तून सुसंस्कारीत ऑफिसर घडविणे. व समाजामध्ये जगण्यासाठी सुसंस्कारशील यशस्वी व्यक्ती बनविणे. हा उद्देश आहे.जेणेकरून एक सुंदर समाज घडू शके ल. संपूर्ण भारतामध्ये सोसायटी अंतर्गत UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कें द्र बालसंस्कार कें द्र, व कौटुंबिक समस्या वरती समुपदेशन कें द्र कुठेही अस्तित्वात नाही. हा शैक्षणिक प्रोजेक्ट मोशी प्राधिकरण सोसायटी अंतर्गत करण्याचा क्रांतिकारक निर्णय आम्ही घेतला याचा आम्हाला अभिमान वाटतो.

प्रा.श्री शिवराज पाटील
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, पुणे
संस्थापक /अध्यक्ष “एक घास फौंऊडेशन”( महाराष्ट्र राज्य)
प्रणेते -चला महाराष्ट्र घडवूया
E. Mail. shivrajpatil@gmail.com
(अनुभव 20 वर्षे)

"कुछ भी बनो मुबारक है, लेकिन पहले इंसान बनो"

आमच्याबद्दल

"एक घास फौंडेशन द्वारे "चला महाराष्ट्र घडवूया" अंतर्गत सामाजिक बांधिलकी चे उपक्रम​

“चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी” या प्रकल्पाचा मुख्य आत्मा सामाजिक बांधिलकी असणारे खालीलप्रमाणे उपक्रम राबविणे.

आमची दृष्टी

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तलाठी,ग्रामसेवक,पोलीस भरती,आर्मी, नेव्ही,डीएड सीईटी,बीएड सीईटी,बँकिंग रेल्वे याबरोबरच स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षेचे मोफत शिक्षण देऊन समाजामध्ये क्रांती निर्माण करणे व या क्रांतिकारी शिक्षणातून जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करणे हे प्रमुख कर्तव्य आणि उद्दिष्ट आहे |

आज समाजामध्ये संस्काराची नितांत आवश्यकता असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहान मुलांच्यासाठी बालसंस्कार व युवा वर्गासाठी युवा संस्कार ऑनलाईन पद्धतीने काही ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने देऊन महाराष्ट्रातील युवा पिढी सुसंस्कारित घडविणे. हे आमचे परम कर्तव्य समजतो.

अतिशय महागड्या शिक्षण पद्धतीमुळे आणि महागड्या कोचिंग क्लासेस मुळे अनेक गरीब मुले-मुली/युवा वर्ग बुद्धिमान असूनही IAS/IPS/IFS होण्यापासून वंचित राहतो. हीच बाब लक्षात ठेवून आम्ही 6 वी पासूनच IAS/IPS ची तयारी हा शैक्षणिक क्रांतिकारी मोफत उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवित आहोत. महाराष्ट्रातूनच देशाला आगामी काळात नीतिमत्ता युक्त,बुद्धिमान,सुसंस्कृत असणारा व मूल्ये जोपासणारा प्रशासकीय अधिकारी देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शैक्षणिक क्रांती द्वारे संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि म.फुले जी यांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडविणे |

“चला महाराष्ट्र घडवूया सामाजिक बांधिलकी व समतेच्या विचारावर चालणारे शैक्षणिक ज्ञानमंदिर”

आमचे ध्येय​

एक घास समाजासाठी या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विनाअनुदानित अनाथाश्रम, वृद्धाश्रम,वंचित,गरीब व निराधार मुलांचे आश्रम यांना दोन वेळचे जेवण कपडे व उपयुक्त शिक्षण देणे हा प्रमुख उद्देश आहे|

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या केलेल्या मुलांचे संगोपन, मोफत स्पर्धात्मक शिक्षण, वंचित गरीब निराधार व बुद्धिमान मुलांचे त्यांच्या बुद्धीच्या कुवतीनुसार मोफत मार्गदर्शन हा उद्देश आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आश्रमातील विधवा,अपंग,निराधार,अनाथ, मुली-मुले,गरीब,वंचित व बेघर स्त्रिया यांच्यासाठी त्यांच्या बुद्धिमत्ता नुसार पूर्णता सर्व कोर्सेसची मोफत माहिती व स्पर्धा परीक्षेचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने व मोफत त्यांच्याच आश्रमामध्ये दिले  जाईल.

महाराष्ट्रातील मतिमंद अनाथ मुला-मुलींसाठी च्या आश्रमासाठी विशेष सहायता केंद्र स्थापन करणे.यामध्ये जीवनावश्यक वस्तू,किराणा धान्य,कपडे व औषधे यांचा समाविष्ट असेल.

महाराष्ट्रातील अनाथ बेघर गरीब वंचित निराधार मुले व स्त्रिया यांना जीवन जगण्याची नवी दिशा देणे व चला महाराष्ट्र घडवूया या क्रांतिकारी उपक्रमाद्वारे करिअर संदर्भात मोफत मार्गदर्शन देऊन त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देणे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम कमी झाले पाहिजेत यासाठी जनजागृती करणे पण जे वृद्धाश्रमांमध्ये आहेत त्यांना त्यांचा शेवट गोड करण्यासाठी वेगवेगळ्या मनोरंजनात्मक व अध्यात्मक उपक्रमाद्वारे दुःख विसरायला लावणे व त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत मापक आनंद देणे.

100 फॅमिली=एक अनाथ आश्रम दत्तक योजना- यामध्ये अनाथ मुलांचे वाढदिवस सर्व फॅमिली ने साजरे करणे त्यांना शिक्षणासाठी वह्या,पुस्तके देणे त्यांना वर्षातून दोन शालेय गणवेश देणे याचबरोबर 100 कुटुंबातील प्रत्येकांच्या वाढदिवशी एका अनाथ मुलां-मुलीच्या ची शैक्षणिक फी वार्षिक कमीतकमी 1500/- ते दोन हजार पाचशे पर्यंत भरून आत्मिक आनंद व आशीर्वाद प्राप्त करणे.

“चला महाराष्ट्र घडवूया”

या उक्तीप्रमाणे आम्ही उद्याचे देशाचे भविष्य घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. या सामाजिक क्रांती घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमासाठी प्रोत्साहन , पाठिंबा व सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

IMG-20220416-WA0019 - Copy

बाल संस्कार

IMG-20220513-WA0229

युवा संस्कार - IAS/MPSC/UPSC ची तयारी

Screenshot (51)

7 वी पासूनच IAS/IPS ची तयारी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

“चला महाराष्ट्र घडवूया - एक घास समाजासाठी”

चला महाराष्ट्र घडवूया वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे वंचित,गरीब,निराधार व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, स्वयंपूर्ण गाव स्थापन करण्या पाठीमागचे उद्दिष्टे |

20211114_121704
20211114_121355

अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम

एक घास समाजासाठी परिवाराचा पहिला वर्धापनदिन

Replacement of एक घास समाजासाठी परिवाराचा पहिला वर्धापनदिन
20211225_115752
WhatsApp Image 2022-07-05 at 9.28.09 PM (1)
WhatsApp Image 2022-07-05 at 9.28.09 PM

किनारा वृद्धाश्रम व मतिमंद सेवाश्रम कामशेत

सदस्य मंडळ

एक घास फाऊंडेशन. संचालक मंडळ

श्री. शिवराज पाटील

संस्थापक – अध्यक्ष

सौ. मोनिका पाटील

उपाध्यक्ष

श्री. मनोज माळी

सचिव.

श्री. देवेंदर काळे

खजिनदार

श्री शिवराज दलाल

संचालक

श्री धीरज बिराजदार

संचालक

श्री. प्रकाश सोनावणे

संचालक

श्री. काशिनाथ हिरमुखे

संचालक

श्री. योगेश कुलकर्णी

संचालक

"पुरस्कार आणि ओळख"

  • श्री जयंत पाटील जलसपंदा मंत्री महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित

  • कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते “संस्कारशील शिक्षक” पुरस्काराने सन्मानित.

  • पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका आयुक्त श्री राजीव जाधव यांच्या हस्ते “उत्कृष शैक्षणिक कार्याचा” पुरस्कार.

  • संजय बोकरे ग्रुप ऑफ़ इंस्टिट्यूट व मैनेजमेंट सांगली यांचा या सामाजिक उपक्रमासाठी “संजय बोकरे पुरस्काराने” सन्मानित.

  • रोटरी क्लब पुणे कडून “शैक्षणिक उत्कृषता” सन्मान (2021-22)

स्वयंसेवक कार्यक्रम

वाढत्या लोकसंख्येमुळे, चला महाराष्ट्र घडवूया करत असलेले कार्य अवाढव्य बनते. आम्ही सर्व वचनबद्ध लोकांचे स्वागत करतो, तरुण किंवा वृद्ध, गरजू लोकांच्या कारणासाठी येऊन स्वयंसेवा करण्यासाठी. सामान्य काळात किंवा आपत्तीच्या काळात स्वयंसेवक सक्रिय भूमिका बजावतात. व्यावसायिक, विद्यार्थी, सेवानिवृत्त किंवा सेवा करणारे, आमचे कार्यक्रम किंवा वकिली कार्य पार पाडण्यात मदत करतात.

तुम्हाला स्वारस्य असल्यास, या साइटवर तुमचे तपशील भरा आणि आम्ही तुमच्याशी संपर्क साधू

धर्मादाय निधी

आज गरीब आजोबांना आधार द्या. असहाय्य आणि बेघर, त्यांना काळजी करणारे कोणीही नाही. वृद्धांना स्वतंत्र होण्यासाठी मदत करण्यासाठी आजच दान करा. वृद्धांना वाचवण्यासाठी देणगी द्या. ग्रॅनला समर्थन देण्यासाठी देणगी द्या. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी देणगी द्या. तुमची छोटीशी देणगी मोठा बदल घडवू शकते.

आमच्यात सामील व्हा

या चळवळीमध्ये कोणास सहभागी होता येईल?

या क्रांतिकारी चळवळी मध्ये जात,पात,धर्म मानत नसलेले समाजातील सर्व घटकांचा समाविष्ट असेल. ज्यांना माणूस आणि माणुसकी यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे.व जी व्यक्ती जातीव्यवस्थे पेक्षा मानव धर्म सर्वश्रेष्ठ मानत असेल त्या व्यक्तींचा धर्म मानवता,जात माणुसकी आणि कर्मही माणुसकी असेल अशा सर्व व्यक्तींना या क्रांतिकारी चळवळीमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल.

“कुछ भी बनो मुबारक है लेकिन पहले इंसान बनो”

छत्रपती शिवाजी महाराजांनी भरकटलेल्या तरुण मावळ्यांना एकत्र करून जे आदिलशाही व निजामशाही च्या दरबारी चाकरी करायचे त्यांची शक्ती राजांनी स्वराज्यासाठी वापरली. आणि पहा रामराज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य उभे राहिले.महाराज नेहमी म्हणायचे, “जिथे पर्यंत माझी नजर तिथे पर्यंत माझे स्वराज्य” आणि या स्वराज्यामध्ये एकाही अबले च्या केसाला कधी धक्का लागला नाही.डॉ. आंबेडकरांनी सैरभैर झालेल्या आपल्या बांधवांना एकत्र करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले म्हणून देशाचा राष्ट्रपती ही एक दलित होऊ शकला याचा अभिमान आहे.जातीविरहित समाज घडवायचा असेल तर आपल्याला माणूस बनायला हवे व यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत बालसंस्कार व युव