किनारा (वृद्धाश्रम)
“चला महाराष्ट्र घडवू या,एक घास समाजासाठी” परिवारातर्फे किनारा वृद्धाश्रम व मतिमंद सेवाश्रम कामशेत येथे भेट आणि संपूर्ण महिन्याचे किराणा भरून वृद्ध अनाथ मतिमंद आजीआजोबाच्या आशिर्वादाला आपण प्राप्त झालो आहोत.माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्यांचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचा एक घास त्यांच्या जीवनात संपूर्ण महिना आनंद निर्माण करेल याबद्दल शंका नाही.
आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर मिळून बनते ती आई इथे आईचाच बाजार मांडला हो. आईलाच घरातून हाकलून दिल. आईच दूध पिऊन मोठं झालेला मुलगा आईला वृद्धाश्रमात ठेवतो. अग्नी द्यायला ही तो येत नाही. असं काय पाप केल हो त्या माऊलींनी.निराधार जीवन आणि शेवट बेवारस असं आयुष्य. सगळंच शब्दाच्या पलीकडचं.तरी ती आई म्हणते एकदाच माझ्या मुलाची भेट घडवा..कसलं हे आईच काळीज..ज्यांना आई नाही ना त्यांना आईची किंमत समजेल. नका हो दुखवू त्या माउलीला. ती गेली ना फक्त स्वर्ग तर आहे पण देव नाही अशी अवस्था होते.डोळे पुसू या. चला आईबाबाचे चरण धरू या. ही कथा नाही “किनारा” वृद्धाश्रमात तील एक एक आजी आजोबांची कहाणी आहे

या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की असा समाज जो केवळ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधतो आणि त्यांची काळजी घेतो असे नाही तर त्यांच्याकडून “निरोगी आणि शांततापूर्ण समाजासाठी आवश्यक मूल्ये” शिकतो. साहचर्य, भावनिक आधार, उपचारात्मक व्यवसाय, करमणूक सुविधा आणि सामाजिक अलगाव दूर करण्यासाठी उपक्रम प्रदान करण्यासाठी आम्ही “किनारा” मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्यांनी जोपासलेल्या जीवनातील उच्च मूल्यांची पुनर्स्थापना करणे.
कार्यक्रमाचे फोटो





