अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम

बालदिन 14 /11/2021  या दिवशी एक घास समाजासाठी परिवाराच्या वतीने अभिनव संकल्पना राबवण्यात आली.अनिकेत मतिमंद व अनाथ मुलांच्या बरोबर बालदिन साजरा करण्याचा.हा *अभिनव सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला त्यांच्याकडे ही शब्द नाहीत. चांगल्या लोकांचे कौतुक कोणीही करत पण मायबाप नसलेले अनाथ, मतिमंद मुलाचे डान्स, गीते आणि गोड संवाद यामुळे ही निरागस मुलं-मुली भारावून गेली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद परमेश्वर च्या उपस्थीती चा प्रत्यय देत होता.असं वाटलं देवा थोड अजून दुःख दे पण अनाथ म्हणून जन्माला घालू नको.मायबाप नसलेली लेकरं आम्ही पहिली ना त्यांचा बाप बनू शकतो ना आई फक्त हताशपणे बघत होतो पण आपण त्यांना घास भरवू शकतो आनंद देऊ शकतो फक्त हवी इच्छाशक्ती.ना त्या मुलांना वर्तमान आहे ना भविष्य सगळं अंधार..चला त्यांचे जीवन प्रकाशमान करू या

    “एक घास समाजासाठी परिवार”

अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम मध्ये एक घास समाजासाठी परिवारातर्फे पूर्ण एक महिण्याचा किराणा रुपी सेवा प्रदान. ख्रिसमस आम्ही अनिकेत अनाथ मुलामुलींना पोटभर जेवण देऊन आणि एक महिन्याचा रेशन देऊन साजरा केला. 

एक घास समाजासाठी परिवार नेहमी प्रत्येक कर्म माणसा मध्येच देवला पाहून देवाला स्मरून देवाला अर्पण करतो. एक घास समाजासाठी परिवाराचे सदस्य चामुंडा मार्बल चे उद्योगपती श्री ललित जैन साहेब यांनी पुढील काळात अनाथ मुला मुलींसाठी ने-आण करण्यासाठी बस देण्याचे वचन दिले आहे. 

एक घास समजसाठी परिवाराचे आदरणीय सदस्य श्री हिरमुखे साहेब व सन्मानीय माळी साहेब यांनीही दिवाळी फराळ अनिकेत अनाथ आश्रमला देऊन बहुमूल्य आशीर्वादाला पात्र ठरले. एक घास समाजासाठी परिवार आपले नेहमी ऋणी राहील.

कार्यक्रमाचे ध्येय

अनिकेत मतिमंद अनाथ आश्रमसाठी एक महिण्याचे किराणा व दिवाळी खाऊ ची छोटीसी मदत.आम्ही खऱ्या अर्थाने नवरात्री व विजयादशमी साजरा केला.आमच्यासाठी अनिकेत मंदिरच होते आणि संस्थेतील निरागस मुलं देवाचे अस्तित्वच दाखवत होते.”एक घास समाजासाठी”परिवारातील प्रत्येक सदस्याला खुप आशिर्वाद दिले आहेत.धन्यवाद अनिकेत मधील देवदूतानो व माऊली कल्पनाताई.

कार्यक्रमाचे फोटो